Govt educational loan या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 17 ते 30 वर्ष असावे, अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असावा आणि तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी दोन्ही करता आठ लाख रुपयांपर्यंत असावे, अर्जदार हा इयत्ता बारावी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा, तसेच पदवीच्या द्वितीय वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी सुद्धा 60 टक्के गुणांसह पदविका म्हणजेच डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर किमान 500 पेक्षा अधिक असावा. अशा काही अटी या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.
तसेच या योजनेअंतर्गत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र रहिवासी दाखला, अर्जदार व अर्जदाराच्या पालकाचे आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमासाठी कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, अर्जदार व पालकांचा पासपोर्ट फोटो, जन्माचा व वयाचा पुरवठा, पुरावा शैक्षणिक शुल्क संबंधित पत्र शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक शुल्क माफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा, आधार संलग्न बँक खातेपुरावा त्याच सोबत इतर नियमित कागदपत्रांची आवश्यकता असेल.
तसेच या योजनेअंतर्गत आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान इत्यादी अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घेता येणार आहे. तर परदेशातील शिक्षणासाठी सोबतच कलाक्षेत्रासाठी देखील कर्ज घेता येणार आहे.
शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्ता मधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा महामंडळ करेल. तसेच व्याज परतावा करण्यासाठी जास्तीत जास्त पाच वर्ष कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.