Government Bus Pass आवडेल तेथे प्रवास योजना…. संपुर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरा फक्त 1100 रुपयात!

Government Bus Pass आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेचा पास काढण्यास दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे तुम्हाला प्रवास करण्याच्या दहा दिवस आधी या पास साठी अर्ज द्यावा लागतो. आवडेल तेथे कुठेही प्रवास या योजनेचा पास रोजच्या बसेस सोबत कोणत्याही जादा बसेस मध्ये तसेच यात्रेसाठी सोडणाऱ्या बस यासाठी सुद्धा ग्राह्य असतात. त्यामुळे तुम्हाला जिथे फिरायचं आहे तुम्ही मनसोक्त फिरू शकतात. तसेच पास धारक आहेत म्हणून प्रवेश नाकारू नये असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने स्पष्ट सांगितले आहे. पास हरविल्यावर त्याच्या ऐवजी दुसरा पास हा दिला जाणार नाही, तुमच्या पास ची जबाबदारी हि तुमची राहील, ह्याची नोंद घ्यावी.


जर तुम्हाला आरक्षित जागा सुद्धा हवी असेल तर वेगळी रक्कम भरून तुम्ही तुमची जागा सुद्धा आरक्षित करू शकतात. ज्यामुळे तुमचा प्रवास व्यवस्थित होईल. त्यानुसार Government Bus Pass या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घालून दिलेली एक अट म्हणजे तुमच्याकडे असलेली पास कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही म्हणजे कोणालाही देता येणार नाही. तुमच्या पासवर फक्त तुम्हालाच प्रवास करता येईल, इतर कोणालाही त्यावर प्रवास निषिद्ध असेल. तसेच पासचा गैरवापर होतो आहे, असं लक्षात आल्यास पास जप्त देखील करण्यात येतो.


त्याचप्रमाणे प्रवासामध्ये जर आपण मौल्यवान वस्तू घेऊन जात असाल किंवा तुमच्या वस्तूचा नुकसान झालं किंवा तुमचं कोणतंही वैयक्तिक नुकसान झालं तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः असाल. या योजनेच्या नियमानुसार पास मध्ये दिवसाची गणनाही रात्री बारापासून ते दुपारी बारापर्यंत अशी करण्यात येते. म्हणजे पासच्या मदतीने शेवटच्या दिवशी प्रवासी बारा वाजेनंतर प्रवास करत असेल तर तिकीट घेणे बंधनकारक असते.


तुमच्या जवळच्या कोणत्याही बस स्टॉप मध्ये एसटी स्टँड वर जाऊन तुम्ही याबाबतीत माहिती काढू शकतात आणि अर्ज देखील भरू शकतात. स्मार्ट कार्ड योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कोठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.