अंड्याचे टरफल – आपल्या शरीरासाठी अंडे फार महत्वाचे आहे. तसेच या अंड्याचे कवच म्हणजे टरफल देखील तेवढेच उपयोगी आहे. अंड्याच्या या टरफल द्वारे तुम्ही तुमच्या घरातील पाल घराबाहेर काढू शकता. जिथे तुम्हाला सतत पाल दिसत असेल अशा ठिकाणी हे टरफल ठेवा. या अंड्याच्या टरफलीमुळे तुम्ही पालीपासून सुटका मिळवता येईल.
कांदा व लसूण – कांद्याचा व लसणाचा वापर भाजी करण्यासाठी तसेच खाण्यासाठी वापरतात. कांदा, लसुण देखील मानवी शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर हा कांदा, लसूण पालींच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण या कांद्याच्या व लसणाच्या वासाने पाली घराबाहेर निघून जातील. यासाठी जिथे पाली जास्त येत असतील अशा ठिकाणी कांदा किंवा लसूण ठेवून द्या.