SBI e-Mudra loan उद्योजकांना मिळणार १० लाखापर्यंत कर्ज… महिला उद्योजकांना विशेष सवलत! असा करा अर्ज.

या योजनेतंर्गत नॉन-कॉर्पोरेशन, नॉन फार्म आणि मायक्रो एन्टरप्रायझेसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही कोणतीही सरकारी बँक, बिगरसरकारी वित्तीय संस्था, ग्रामीण बँका आणि लहान बँकांमध्ये अर्ज करु शकता.

SBI e-Mudra लोन हवे असल्यास तुम्ही जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीनेही तुम्हाला हे कर्ज मिळवता येईल. त्यासाठी SBI e-Mudra च्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर सूचनांचे पालन करत सर्व माहिती भरावी. यानंतर एक अर्ज भरून तो सबमिट करावा. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो सबमिट केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल.

कोणत्याही लघु उद्योजकाला त्याचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर या योजनेअंतर्गत लोन तुम्हाला मोठी मदत करू शकते. आधी जर भांडवल उभे करायचे असेल तर काहीतरी वस्तू गहाण ठेवून त्यावर व्याजाने पैसे मिळत. परंतु आता या योजनेमुळे हे सगळ्या गोष्टी बंद होऊन कोणतीही वस्तू गहाण न ठेवता हे लोन घेता येणार आहे. ज्याचा फायदा उद्योजकांना फार चांगल्या पद्धतीने होणार आहे. व्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी हे कर्ज आता उद्योजकांना मदत करणार आहे.

या योजनेअंतर्गत परतफेड कालावधी हा ३ ते ५ वर्ष इतका असणार आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड , व्यवसाय घटकाचे नाव, व्यवसायाचा पत्ता, व्यवसायात ऑफर केलेल्या सेवा, व्यवसाय डिटेल्स आणि कागदपत्रे इत्यादी गोष्टी आवश्यक असणारं आहे. त्याचप्रमाणे या लोन साठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगले असण्याची गरज नाही.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

https://sbi.co.in/web/business/sme/lead-generation

क्रेडिट आधारावर, मुद्रा योजनेसाठी रुपे कार्ड प्रदान केले जातात.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.