Education Loan : महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील राजकरणात अनेक हालचाली सुरू आहेत. यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार अनेक आमदार घेऊन भाजप आणि शिंदे गट मध्ये सामील झाले आहेत. यामध्येच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होताच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज (interst free loan) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उच्च शिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जावयाचे असेल किंवा राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर तुम्हाला शैक्षणिक कर्ज दिले जाणार आहे. तुमच्या कर्जावरील व्याजाची रक्कम राज्य सरकार भरणार आहे. (Government Loan Scheme)
आता विद्यार्थ्यांना व्याजदर भरण्याची गरज नाही. कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी आपण इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या वेबसाईटला भेट द्यावी. शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज ऑनलाईन केल्यानंतर कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळातर्फे दिला जातो.
इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या 20 लाख रूपयापर्यंत कर्जाच्या रकमेवरील व्याज परतावा दिल्या जाणार आहे. यामुळे इतर मागास प्रवर्गातील गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होईल.
कर्ज योजनेसाठी पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असणं गरजेचं आहे.
- ग्रामीण भागातील व शहरी भागातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत असणं आवश्यक आहे.
- अर्जदार हा 12वीत 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
- तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
- अर्जदाराचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) 500 पेक्षा जास्त असावा.
कर्ज कोणत्या अभ्यासक्रमासाठी मिळणार?
राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम – MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम
अभियांत्रिकी – B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम
व्यावसायिक अभ्यासक्रम – LLB, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बॅचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA, MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम
कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान – Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc. इत्यादी संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम
अर्जासाठी कागदपत्रे
1) अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला
2) तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
3) रहिवासी दाखला तहसीलदार
4) अर्जदाराचे व पालकांचे आधार कार्ड
5) अर्जदार व अर्जदाराचे पालकांचा फोटो
6) अर्जदाराचा जन्माचा व वयाचा पुरावा
7) शैक्षणिक शुल्क संबधित पत्र
8) शिष्यवृत्ती शैक्षणिक शुल्कमाफी
9) पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र
10) मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा
11) आधार संलग्न बँक खाते पुरावा
12) अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.