Cotton Seeds Variety शेती करायची म्हटलं तर योग्य प्रकारचे बियाणे असणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चांगल्या प्रतीचे बियाणं असेल तर भरघोस पीक येतं. जास्त प्रमाणात चांगल्या प्रतीचे पीक चांगल्या बियाण्यांमुळे येत असत. त्यामुळे बियाणे चांगले निवडणे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. शेतीत कापसाची लागवड करत असताना अनेक प्रकारची बियाणे म्हणजेच वाण आपल्याला मिळतात. पिकासाठी चांगलं वाण कोणते? हे आपल्याला ठाऊक नसते, त्यामुळे त्याबद्दल माहिती जाणून घेणे गरजेचे असते. सध्या कबड्डी वाण हे कापसाच्या पिकासाठी मागच्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय चांगले वाण असल्याचे म्हटले जात आहे. Cotton Seeds Variety तर हे वाण खरंच कापसाच्या पिकासाठी योग्य आहे का? हे जाणून घेणेदेखील गरजेचे आहे.
कबड्डी या वाणाची हलक्या मध्यम तसेच बागायती जमिनीमध्ये सुद्धा लागवड करू शकतात. या वाणाचे बोंड जास्त मोठाही नसतं आणि खूप लहानही नसतं, म्हणजे साधारणता मध्यम स्वरूपाचं या वाणाच बोंड असतं. एका बोंडाचे वजन जवळपास पाच ते सहा ग्रॅम एवढे भरू शकते. Cotton Seeds Variety कबड्डी या वाणाचे एकेरी उत्पादन जर घेतलं तर सरासरी आठ ते पंधरा क्विंटल इतका वजन पाहायला मिळतं तसेच याचा कालावधी 160 ते 180 दिवस असा आहे.
मागच्या वर्षी जून – जुलै या कालावधीत पावसाचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात होतं. ऑगस्ट महिन्यानंतर तर राज्यात पावसाचा धुमाकूळ माजला होता. अशा वातावरणात बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झालं. पाऊस अजिबातच पडत नाही किंवा अति प्रमाणात पाऊस पडतो अशा प्रकारे याबद्दल त्या वातावरणात शेतकऱ्यांना चांगल्या दर्जेदार बियाणांच्या सीड्स निवडणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा बदलत्या आणि कठीण वातावरणात सुद्धा पिके तग धरून राहू शकतील. Cotton Seeds Variety
कबड्डी वाणाचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.