Cotton Seed Variety कापसाचे कब्बडी वाण घ्यायचा विचार करताय? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Cotton Seed Variety कापसाचे कबड्डी हे वाण अतिशय चांगल आहे, असं बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिसादातून समोर आल आहे. मुख्यतः या कपाशी पिकाची लागवड विदर्भ, मराठवाडा या दुष्काळी पट्ट्यात केली जाते. महत्त्वाचं म्हणजे या वाणाची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत केली जाऊ शकते. मध्यम आणि भारी, अगदी कोरडवाहू अशा सर्व प्रकारांच्या जमिनीसाठी या कबड्डी कापूस वाहनाची लागवड करता येते. या कबड्डी वाणाची आणखी एक खासियत अशी कपाशीतील प्रमुख समस्या असणाऱ्या रस शोषक कीड सहनशीत असे हे वाण आहे. रोगनिष्ठ असे हे तुलसी सीड्स चे कबड्डी वाण आहे. Cotton Seed Variety


तसेच चांगल्या वाणासोबतच उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसे की कपाशीची लागवड योग्य कालावधीत करणे, खत व्यवस्थापन, खुरपणी, फवारणी योग्य वेळेत करणे, पावसाची कमतरता असेल तर सिंचनाची व्यवस्था करणे. ठिबक सिंचन असल्यास कपाशीचे नियोजन अतिउत्तम करता येते आणि ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खत देखील देता येते. तसेच कधी पाण्याचा ताण देखील पडला तरी त्या परिस्थितीत सहनशील असं हे वाण आहे.


त्याचप्रकारे कापूस वेचण्यास देखील हे वाण सोपे आहे आणि उच्च प्रतीचा धागा यातून आपल्याला मिळतो. धागा उच्च प्रतीचा असला तर आपल्याला बाजार भाव देखील चांगला मिळतो. त्यामुळे हे वाण अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे एक समान आकाराचे आणि भरपूर बोंड देखील या वाणाला लागतात. बुडापासून ते शेंड्यापर्यंत पाच पाकळी बोंड या वाणाला लागतात. 90% च्या वर आपल्याला पाच पाकळी बोंड या वाणाची पाहायला मिळतात. तसेच या वाणाची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.