Amul Franchise : तुम्ही देखील कमी पैशात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती आहे. अमूलच्या आईस्क्रीम व्यवसायात गुंतवणूक करुन आपण खूप नफा कमवू शकता. यासाठी अमूल कंपनीची फ्रेंचाइजी आहे. ही फ्रेंचाइजी कोणीही घेऊ शकते.
फ्रेंचाइजीद्वारे अनेकजण बक्कळ पैसा कमवत आहे. आज आम्ही तुम्हाला अमूलच्या फ्रँचायझीबद्दल सांगणार आहोत. गुंतवणूकीची किती आवश्यकता असेल याबाबतची देखील माहिती दिली जाईल. या व्यवसायातून कमी गुंतवणुकीत दरमहा चांगली कमाई करता येते. (amul franchise in marathi)
अमूल फ्रेंचाइजी घ्या आणि करा चांगली कमाई
तुम्ही अमुलची फ्रेंचाइजी घेऊन आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंतची आवश्यकता आहे. मशीन आणि कच्चा मालासाठी तुम्हाला 12 लाख रुपये लागतील आणि याशिवाय इतर कामांसाठी 2 ते 3 लाख रुपये खर्च लागेल. जर तुम्हाला हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर तुम्हाला 40 ते 50 लाख रुपये लागू शकतात.
जर तुमच्याकडे 15 लाख रुपये जरी नसले तरी तुम्ही हा व्यवसाय कमी पैशात देखील सुरू करू शकता. अमूल कोणत्याही रॉयल्टी किंवा प्रॉफिट शेअरिंग फ्रेंचायझी देत आहे. 5 ते 6 लाख रुपये खर्च करून देखील छोट्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाच्या सुरूवातीपासूनच चांगला नफा मिळतो.
आईस्क्रीम बनविण्यासाठी काही मशीनची आवश्यकता असते. खाली सर्व मशीनची नावे देण्यात आली आहे.
1) उच्च क्षमतेचा फ्रीज
2) मिश्रण
3) थर्माकोलचा बर्फाचा कूलर बॉक्स
4) समुद्र टाकी
amul ice cream franchise अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला अमूल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्ही अर्ज करून फ्रेंचाइजी घेऊ शकता. तसेच तुम्हाला GST क्रमांक घ्यावा लागेल ज्यावरून तुम्हाला ट्रेडमार्क मिळेल.