pm kusum solar pump Yojana आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा कणा म्हणजे शेतकरी! आज शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून कणखर उभा आहे त्यामूळे आज आपल्या सगळ्यांचं जगणं सोपस्कार आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या उन्नती आणि प्रगती साठी वेळोवेळी सरकार त्यांच्या स्तरावर मोठया प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत व्हावे, त्यांचे उत्पादन वाढावे, उत्पन्न वाढावे यासाठी सरकार प्रयत्नशील असत आणि वेळोवेळी नवनवीन योजनांच्या माध्यमातुन हे काम करीत असतात. त्याचप्रमाणे आता सरकारने नवीन योजना आमलात आणली आहे ती म्हणजे पी एम कुसुम सोलर पंप योजना २०२३!
आता ही पी एम कुसुम सोलर पंप योजना म्हणजे नेमकं काय? ग्रामीण भागात नेहमीच विद्युत पुरवठ्याचे संकट राहिले आहे. कधीही केव्हाही विजेचा तुटवडा निर्माण होतो आणि याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कामावर होत असतो. शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होतात. विद्युत पुरवठ्याशिवाय पिकांना पाणी देऊ शकत नाही. ज्यामुळे पिकांची योग्य वाढ होत नाही आणि शेतकऱ्याला नुकसान होण्याची शक्यता असते. पावसाच्या अनियमिततेमुळे सुद्धा शेतकरीला नुकसादायक झळ सध्या बसत आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातुन पी एम कुसुम सोलर पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे. यातून काय लाभ होणार? याच्या नियम व अटी काय असणार आहे, हे सगळं पुढील लेखातून आपण जाणून घेऊया.
pm kusum solar pump Yojana अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना अनुदानित दरात सिंचनासाठी सौरऊर्जेवर चालणारे पंप पुरवणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी, सहकारी संस्था, शेतकरी व सहकारी गट आणि पंचायती सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.
ज्यामधे
• सरकार शेतकऱ्यांना थेट 60 टक्के अनुदान देणार आहे.
• 30% शेतकऱ्यांना सॉफ्ट लोनद्वारे बँकेकडून दिले जाईल.
• 10% वास्तविक खर्च शेतकऱ्यांना करावा लागेल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता शेती करणे सोयीचे होत आहे. सौरपंपांमुळे डिझेल पंप चालवण्यासाठी डिझेलवर होणारा खर्च वाचेल आणि शेतकऱ्यांना सौरपंपाद्वारे सिंचनाचा विश्वसनीय स्त्रोत उपलब्ध होईल आणि डिझेल पंप चालवताना होणारे घातक प्रदूषण रोखण्यात मदत होईल.
pm kusum solar pump Yojana योजनेंतर्गत शेतकर्यांना मिळणा-या सौरपंपांच्या माध्यमातून शेतात असलेल्या पिकांना हवे तेव्हा पाणी शेतकरी देऊ शकतो ज्यामुळे पिकांची योग्य वाढ होईल आणि पिकांना चांगला भावही मिळेल. या योजनेमुळे शेतकरी बांधव वीज नसतानाही आपल्या शेतात सिंचन करू शकतात. यात शेतकऱ्यांना अतिशय कमी खर्चात पंप उपलब्ध होईल. यातून अतिरिक्त वीज निर्मितीही होईल. शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार ती वीज सरकारी किंवा खाजगी वीज विभागाला विकू शकतील. pm kusum solar yojana योजनेंतर्गत बसविण्यात येणारे सोलर पॅनल नापीक जमिनीवरच बसविण्यात येणार आहेत, जेणेकरून नापीक जमिनीचाही वापर करता येईल आणि नापीक जमिनीतून उत्पन्नही मिळवता येईल. योजनेचा जास्तीत जास्त लाभ अशा राज्यातील शेतकऱ्यांना दिला जाईल जेथे कमी पाऊस आहे किंवा जेथे सिंचनासाठी पुरेशी वीज उपलब्ध नाही. mnre gov in solar pump registration
ऑनलाइन नोंदणी केली असेल, तर अर्जदाराला अर्ज आयडी देण्यात येईल त्यावरून अर्जाची प्रिंट आउट त्याच्याकडे सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. ऑफलाइन अर्ज केला असेल तर अर्जदाराला एक पावती दिली जाईल, जी अर्जदाराने जपून ठेवावी लागेल. अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, सातबारा, बँक खाते क्रमांक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि मोबाईल नंबर असे असावे आणि प्रति मेगावॅटनुसार शेतकऱ्याजवळ सुमारे 2 हेक्टर जमीन असायला हवी.