महिंद्रा उद्योग समूह.. भारतातील प्रमुख उद्योग समूहांपैकी एक.. महिंद्रा कंपनीच्या (mahindra company) सर्वच गाड्यांना ग्राहकांची चांगली मागणी असते. मात्र, त्यातील एका गाडीने सुरुवातीपासून ग्राहकांना आकर्षित केलं.. ती म्हणजे, स्कॉर्पियो.. महिंद्रा कंपनीची ही धाकड कार काही काळ सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली होती..ग्राहकांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन ‘महिंद्रा’ कंपनी आता नव्या अवतारात ‘स्कॉर्पियो’ (Scorpio) घेऊन येत आहे.
या गाडीचं नवं व्हर्जन लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. अत्याधुनिक स्टाइल, अॅडव्हान्स फिचर्स, नवा लोगो नि कूल कॅबिनसह ‘स्कॉर्पियो ‘चं नवं मॉडेल येत्या जून महिन्यात लाँच होणार असल्याचे समजते..‘एसयूव्ही मार्केट’मध्ये स्कॉर्पियो कारचा प्रचंड दबदबा राहिलेला आहे.
त्यामुळे या नव्या व्हर्जनमध्ये तितकीच काळजी बाळगून काम करण्यात आलंय. ‘महिंद्रा’ची टीम नव्या स्कॉर्पियोला आणखी आक्रमक ढंगात बाजारात सादर करणार आहे. त्यात क्रोम फिनिशमध्ये एक प्रॉमिनन्ट मल्टी-स्लेटेड ग्रिलचा समावेश आहे. अर्थात ‘महिंद्राकडून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.कशी असेल नवी स्कॉर्पियो ..? – नव्या ‘स्कॉर्पियो ‘मध्ये अपडेटेड बम्पर – माऊंडेट ‘सी’ आकाराचे एलईडी डीआरएल पाहायला मिळतील. शिवाय हेडलॅम्प आणि बंपरदेखील अपग्रेड करण्यात आलंय. – स्कॉर्पियो ‘चं हे नवं व्हर्जन कंपनीच्या नव्या लोगोसह बाजारात दाखल होणार आहे. कंपनीचा नवा लोगो याआधी ‘XUV 700’ या कारमध्ये वापरला होता.- ‘एसयूव्ही’च्या धाकड लूकला आणखी आक्रमक रूप देण्यासाठी एक मोठी स्किड प्लेट कारला जोडली आहे.
• या नव्या कारमध्ये ‘मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स’ असतील. त्यात 2.0 लिटर टर्बो पेट्रोल मोटर आणि 2.2 लिटर डिझल युनिट दिलं जाईल.- कारची पावर आणि टॉर्क आऊटपुट ‘महिंद्रा’च्या ‘थार’ कारसारखंच असण्याची शक्यता आहे.ग्राहकांना या ‘स्कॉर्पियो ‘मध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम मिळणार आहे. वर्टिकल माऊंटेड एसी वेंट्स असतील. कंट्रोल सॉफ्ट टच बटण आणि रोटरी डायल असणार आहे. त्यातून इंटेरियटला चांगला लूक येईल.
शिवाय लेटेस्ट स्कॉर्पियोमध्ये वायरलेस अॅन्ड्रॉईड ऑटो (Android Auto), अॅपल कारप्ले (Apple CarPlay) आणि अॅलेक्सा (Alexa) सपोर्ट मिळणार आहे. नव्या स्कॉर्पियोमध्ये एक सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल असेल. मध्यभागी एक मल्टी-इन्फो डिस्प्ले असेल.डिजिटल डिस्प्ले टायर प्रेशर, सीट बेल्ट रिमाइंडर, टेंपरेचर, रेंज, ट्रिप मीटर, एअरवेज स्पीड यांसारख्या अनेक सुविधा ‘स्कॉर्पियो’च्या नव्या व्हर्जनमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत.