ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत उपलब्ध नाहीत, अशा शेतकऱ्यांना पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. ते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच २० गुंठे ते ६ हेक्टर जमीन असलेले शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील.
या योजनेअंतर्गत सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोअरवेल घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. सरकारच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दाखल करायचा आहे. तेथे नोंदणी करून नंतर युझर नेम अणि पासवर्ड दिला जाईल. मग आपण आपला आयडी पासवर्ड टाकुन लॉगीइन करायचे आहे अणि बोअरवेल सबसिडी योजनेअंतर्गत आपला अर्ज दाखल करायचा आहे. यानंतर शेतामध्येबोअरवेलसाठी 20000 रु. अनुदान दिले जाईल. या बोअरवेल अनुदान योजनेसाठी महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना 80 टक्के अनुदान देत आहे. या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी अनुदानासाठी अर्ज करू शकतात.
बोअरवेल योजनेअंतर्गत कशा प्रकारे अर्ज करावा?