फक्त 18 मिनिटात ‘ही’ बाईक झाली ‘सोल्ड आउट’, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Harley Davidson ने 2019 मध्ये LiveWire इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करून इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये प्रवेश केला.

Harley Davidson ने 2019 मध्ये LiveWire इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करून इलेक्ट्रिक मोबिलिटी स्पेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून LiveWire अमेरिकन बाईक  कंपनीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. याच सेगमेंटमध्ये कंपनीने पहिले मॉडेल LiveWire One मागच्या वर्षी सादर केले होते. आता कंपनीने EV स्पेसमध्ये आपली पुढील बाईक लॉन्च केली आहे. जी S2 Del Mar Edition आहे. ही नवीन इलेक्ट्रिक बाईक Harley Davidson Livewire ब्रँड अंतर्गत दुसरे मॉडेल आहे.

किंमत 

LiveWire One ची किंमत 22 हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. जी भारतीय चलनात 17 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे हा ब्रँड जनतेपर्यंत नेण्यासाठी स्वस्त इलेक्ट्रिक मोटरसायकल आणण्याची गरज आहे. लॉन्च झाल्यावर S2 Del Mar ची किंमत 15 हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 8.9 लाख रुपये असेल.

बॅटरीवर चालणारी बाईक नवीन मॉड्यूलर एरो ईव्ही आर्किटेक्चरवर आधारित आहे. हे नवीन प्लॅटफॉर्म S3 आणि S4 सारख्या आगामी LiveWire इलेक्ट्रिक बाईकसाठी आधार म्हणून काम करेल. S2 Del Mar हे मोनोकोक फ्रेमवर बांधले गेले आहे. ज्यात अॅल्युमिनियम आवरण असलेली बॅटरी स्ट्रेस्ड मेंबर म्हणून वापरली जाते. त्यामुळे स्टीयरिंग हेड, तसेच स्विंगआर्म पिव्होट्स, बॅटरी पॅकशी जोडलेले आहेत.

या इलेक्ट्रिक बाईकच्या मोटरबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. फोटो दिसत असल्या प्रमाणे स्विंगआर्म पिव्होट मोटर पॅकच्या अगदी मागे जाईल. S2 Del Mar मध्ये बॅटरीसाठी एअर-कूल्ड सेटअप असण्याची अपेक्षा आहे, कारण ते LiveWire One च्या तुलनेत कमी टोकाचे मॉडेल आहे. या बाईकमध्ये दिलेली मोटर 700cc IC इंजिनने चालणाऱ्या मोटरसायकलप्रमाणे काम करेल. स्पीडबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक फक्त 3.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. हार्ले डेव्हिडसन बॅटरी पॅकसाठी 21700 प्रकारच्या सेलचा वापर करेल, जे एका चार्जवर किमान 160 किमीची रेंज देऊ शकतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment