भारतीय बाजारपेठेत दुचाकी क्षेत्रात स्कूटर ची लांबलचक यादी पाहायला मिळते. आज आम्ही तुम्हाला या रिपोर्ट मध्ये या सेगमेंटमधील लोकप्रिय स्कूटर TVS स्कूटी पेप प्लसबद्दल सांगणार आहोत.
कंपनी ने या स्कूटरला अतिशय आकर्षक लूक दिला असून यामध्ये अनेक आधुनिक फीचर्सही दिले आहेत. कंपनी च्या या स्कूटर मध्ये मजबूत इंजिनसोबतच तुम्हाला अधिक मायलेजही मिळत आहे.
TVS स्कूटी पेप प्लस स्कूटर ची स्पेसिफिकेशन:
TVS Scooty Pep Plus ही स्कूटर कंपनी ची मायलेज देणारी स्कूटर आहे आणि ती स्लीक डिझाइन सह बाजारात उपलब्ध आहे. कंपनी ने या स्कूटर चे दोन प्रकार भारतीय बाजार पेठेत विक्रीसाठी सादर केले आहेत. या स्कूटर मध्ये कंपनी ने 87.8 सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन बसवले आहे.
हे इंजिन 6.5 Nm पीक टॉर्क सह 5.4 PS कमाल पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. या स्कूटर मध्ये उत्तम ब्रेकिंग साठी कंपनीने तिच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकां मध्ये ड्रम ब्रेकचे संयोजन दिले आहे. कंपनी ने या मायलेज स्कूटर मध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देखील दिले आहेत.
TVS स्कूटी पेप प्लस स्कूटर ची किंमत:
कंपनी च्या म्हणण्या नुसार, TVS स्कूटी पेप प्लस स्कूटर मध्ये, तुम्हाला ARAI द्वारे प्रमाणित 65 kmpl चे मायलेज मिळते. कंपनीने या स्कूटर मध्ये चांगले सस्पेन्शन दिले आहे.
तसेच त्याचे वजन ही कंपनी ने खूप हलके ठेवले आहे, ज्यामुळे ते हाताळण्यास सोपे जाते. कंपनी च्या या लोकप्रिय स्कूटरची सुरवाती ची एक्स-शोरूम किंमत 60,334 रुपये ठेवली असून टॉप व्हेरियंट ची एक्स शोरूम किंमत 63,234 रुपये ठेवली आहे.