अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
महाविद्यालय/शाळा/वसतिगृहाची फी. परीक्षा, लायब्ररी आणि प्रयोगशाळांसाठी शुल्क. योग्य असल्यास, विद्यार्थ्याचा जीवन विमा प्रीमियम. पुस्तके, उपकरणे आणि गणवेशासाठी इत्यादी गोष्टींसाठी कर्ज उपलब्ध आहे. आवश्यक असल्यास, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वाजवी दरात संगणक खरेदी करता येईल. अभ्यासक्रम पूर्ण करण्याशी संबंधित इतर कोणतेही खर्च, जसे की अभ्यास सहल, प्रकल्प कार्य किंवा थीसिस या गोष्टीही यातून साध्य करता येतील.
शैक्षणिक कर्जासाठी किमान 60 % असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला 60% किंवा 60% जास्त असल्यास तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी पात्र आहात.या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वयाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिका, बँक पासबुक, आयडी पुरावा, पत्त्याचा पुरावा, अभ्यासक्रम तपशील, पालक आणि विद्यार्थी पॅन कार्ड आणि आधार कार्ड, पालकांचा उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागद पत्रे आवश्यक आहेत.
तसेच, जर कोणतीही बँक किंवा संस्था तुमच्याकडून प्रोसेसिंग फीची मागणी करत असेल तर तुम्ही त्याविरुद्ध तक्रार देखील करू शकता कारण या कर्जासाठी कोणतीही संस्था कोणत्याही प्रकारच्या फीची मागणी करत नाही.
कर्ज घेण्यापूर्वी बँकेची किंवा संस्थेची संपूर्ण माहिती मिळवा. सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. तुमच्या गरजेनुसार कर्जाची रक्कम घ्या. प्रत्येक बँक किंवा संस्थेचे व्याजदर किती आहेत हे देखील तपासून घ्या.
हे देखील वाचा-