प्रधानमंत्री रोजगार योजना 2023 योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी १० लाख ते २५ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील ग्रामीण किंवा शहरातील तरुणांना आपला व्यवसाय उभा करण्यासाठी व्यवसाय कर्ज घेता येईल. त्यासाठी सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊन अर्ज करू शकतात. या योजनेसाठी अर्ज करण्यास अर्जदाराचे पण कार्ड, अर्जदाराचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, मोबाइल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागद पत्रांची आवश्यकता आहे.
PMEGP योजनेंतर्गत कोणतीही उत्पन्न मर्यादा असणार नाही, देशातील कोणीही १८वर्ष वयापेक्षा जास्त वयाची व्यक्ती या योजनेंतर्गत पात्र असेल. उत्पादन क्षेत्रात १०लाखापर्यंत उद्योग उभारण्यासाठी तसेच सेवा क्षेत्रात ५ लाख रुपयांपर्यंत उद्योग उभारणीसाठी उमेदवारांचे कमीत कमी इयत्ता आठवी पास असणे आवश्यक आहे. केवळ नवीन प्रकल्पांनाच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल.
योजनेच्या अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार तरुण, पारंपारिक कारागीर यांना मोठ्याप्रमाणात शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, जेणेकरून ग्रामीण तरुणांचे शहराकडे स्थलांतर कमी होईल आणि त्यामुळे उद्भवणारे प्रश्न सुटतील. तसेच रोजगारीच्या दारात वाढ करणे आणि त्यात योगदान देणे, त्याचबरोबर कारागिरांची मजुरी मिळविण्याची क्षमता वाढविणे हे देखील या मागील उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊन देशातील नागरिक स्वावलंबी होतील.
हे देखील वाचा-