मोबाईल मध्ये सातबारा कसा बघता येईल.
1. सर्वप्रथम इंस्टॉल ब्राऊझर वर जाऊन वरती सर्चच्या
ऑप्शन मध्ये जाऊन mahabhulekh अस टाईप करा.
2. त्यानंतर पहिलीच ओपन होणारी वेबसाईट वर जाऊन
3. विना स्वाक्षरी सातबारा असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
4. त्यानंतर विभाग निवडा असा पर्याय येईल. तिथं विभाग निवडा यावर क्लिक करून विविध विभाग दिसतील. त्यातून तुमचा विभाग निवडा.
5. त्यानंतर Go या बटणावर जाऊन क्लिक कर.
6. नंतर तिने पर्याय येतील त्यातील सातबारा या पर्यायावर क्लिक करा.
7. जिल्हा पर्याय यावर क्लिक करून जिल्हा निवडा.
8. त्यानंतर तालुका पर्याय यावर क्लिक करून तालुका निवडा.
9. गाव पर्याय यावर क्लिक करून गाव निवडा.
10. त्यांनतर सर्वे नंबर किंवा गट नंबर तसेच अक्षरी सर्वे नंबर किंवा गट नंबर, पहिले नाव, मधले नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव इत्यादी पर्याय तिथं दिसतील.
11. त्यामधून तुम्हाला जो पर्याय वापरायचा असेल तो वापरून तिथे एक बॉक्स येईल त्यामध्ये ती माहिती भरा. त्यांनतर शोधा या बटणावर क्लिक करा.
12. त्यांनतर सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडा.
13. त्यांनतर एक नंबर येईल त्यावर क्लिक करा. त्यांनतर allow असा एक पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
14. त्यांनतर सातबारा पहा अशा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.
15. त्यांनतर captcha code येईल तो तसाच तसा भरून नंतर verify captcha and display 7/12 असा पर्याय येईल त्यावर क्लिक करा.
16. त्यानंतर तुम्हाला एक पेजवर सातबारा दिसेल.
अशा प्रक्रियेतून मोबाईल वर डिजिटल सातबारा बघता येईल. त्यानंतर शेअरच्या माध्यमातून तो सातबारा उतारा कोणाला पाठवू सुद्धा शकतात. त्याची प्रिंट काढू शकतात त्याचप्रमाणे तो मोबाईल मध्ये सेव्ह सुद्धा करू शकतात. अशा या शासनाच्या निर्णयामुळे आता सातबारा आपण मोबाईल मध्ये बघू शकतो. १८८० च्या नंतरचे संपूर्ण शेतीची आराखडे या प्रक्रियेतून मोबाइलच्या माध्यमातून बघता येऊ शकतात
हे देखील वाचा-