राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर अनुदान योजनेच्या सहाय्याने विहीर खोदण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे. अनेक चिंतांमधून मुक्त होऊन लोक शेती क्षेत्राकडे सुद्धा आकर्षित होतील. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे.
https://drive.google.com/file/d/1RP3sU2S9N-hs9p_FQwxF4lx0The_Wn5L/view
विहीर अनुदान योजनेअंतर्गत अटी :
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच विहीर अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- लाभधारकाकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असावे.
- लाभार्थी शेतक-याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील.
- शेतात ज्या ठिकाणी विहीर खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर नसावी.
- दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद नसावी.
- अर्जदार व्यक्तीच्या जमिनीचे सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
विहीर अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-